CM Eknath Shinde | ‘मी केलेल्या उठावाची दखल जग घेतंय…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टाकली गजानन किर्तीकरांवर मोठी जबाबदारी

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन- एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) १२ खासदार शिंदे गटात गेले. त्यात, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आणि कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गटातील (Shinde Group) खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कीर्तिकरांचे स्वागत केले. गजानन कीर्तिकर आल्यामुळे त्यांच्यावरचा संघटनात्मक भार कमी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, ‘मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे. संघटनात्म बांधणी कशी बांधायची ती गजानन किर्तीकर यांना माहिती आहे. शिवसेनेच्या वाढीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते आपल्याबरोबर आलेत याचा मला आनंद आहे. त्यांच्या कौशल्यामुळे संघटना बांधणीला मदत होणार आहे. कीर्तिकरांवर आमच्याकडे येण्यासाठी कोणतीही अट नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackarey) यांची संघटना बलवान करण्यासाठी मला तुमच्याकडे यायचे आहे, एवढंच ते मला म्हणाले.’

‘मी आज स्वत:ला नशीबवान समजतो, मी केलेल्या उठावाची दखल जगाने घेतली.
गजानन किर्तीकर आपल्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे.
मुंबई कालही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आजही बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि उद्याही
बाळासाहेबांची राहणार.’ असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहे.
गजानन कीर्तिकर जरी शिंदे गटात आले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अजूनही उद्धव ठाकरे गटात आहे.

Web Title :-  CM Eknath Shinde | big responsibility on the shoulders of gajanan kirtikar-cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Gajanan Kirtikar | वडील शिंदेंकडे तर मुलगा उद्धव ठाकरेंकडे; उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर गुन्हे शाखेची कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘भाजपकडे गेलात की प्रकरण बंद, दुसरीकडे गेलात की सुरु…; राठोड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ आणि भाजपला टोला