Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘भाजपकडे गेलात की प्रकरण बंद, दुसरीकडे गेलात की सुरु…; राठोड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ आणि भाजपला टोला

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन- Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘कधी आंदोलन करायचं, कधी थांबवायचं हे राजकीय हेतू पुरस्कृत असतं, पूजा चव्हाणसारख्या सामान्य मुलीला न्याय देण्यासाठी नसतं. चित्रा वाघ यांनी विषय कसा संपवला? क्लीन चिट कोणत्या आधारे दिली? त्यामुळे मला वाटतं त्यांनी संजय राठोड यांची माफी मागितली पाहिजे. जशा आमच्या भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं आता चित्रा वाघ यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांची दीदी व्हायला हरकत नाही’, असा टोला सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लावला आहे. त्या (Sushama Andhare) एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. (Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh)

चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide) प्रकरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात लढा उभारला होता. पण आता त्यानी यू टर्न घेतला आहे. संजय राठोड प्रकरण आता संपवूया, महाराष्ट्रात त्याशिवाय खूप विषय आणि प्रश्न आहेत. माझा त्यांच्याविरोधातला लढा न्यायालयात सुरू राहील, असे वक्तव्य भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केले. यानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackarey Group) चित्रा वाघ आणि भाजपावर जोरदार हल्ला केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चित्रा वाघ
आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘भावना गवळी जशा मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी
संजय राठोडांची दीदी व्हावं, माणूस भाजपकडे गेला की प्रकरण संपतं, फाईल बंद होते, विषय संपून जातो.
पण भाजपला सोडून दुसरीकडे गेलात की प्रकरण चालू होतं. फाईल उघडल्या जातात. भाजपाच्या महिला
कार्यकर्त्या या फक्त देवेंद्रजींनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करतात.’ तसेच संजय राठोड यांची चित्रा वाघ
यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

Web Title :-  Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | shivsena sushma andhare slams bjp chitra wagh over sanjay rathod

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Gajanan Kirtikar | वडील शिंदेंकडे तर मुलगा उद्धव ठाकरेंकडे; उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर गुन्हे शाखेची कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त