CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी फोन फिरवत नंदुरबारला दिले 7 कोटी

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात नगरपरिषदेच्या इमारत लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या एका फोनवर नंदुरबारमधील नगरपरिषदेचा प्रलंबित निधी देखील देण्यात आला.

 

नंदुरबार नगरपंचायतीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) आदी लोक उपस्थित होते. यावेळी रघुवंशी यांनी भाषण केले आणि सांगितले की, शासनाकडून येणारा 7 कोटी 28 लाखांचा निधी अद्याप आलेला नाही. त्यांनी तो लवकरात लवकर देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि प्रलंबित निधी देण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर अवघ्या तीन मिनिटांत अधिकाऱ्यांनी आदेश काढले आणि मंचावरुन 7 कोटी 28 लाखांचा निधी नंदुरबार नगरपंचायतीला दिला. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले.

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचला.
आमच्या सरकारने आल्यापासून 72 मोठे निर्णय घेतले आणि अनेक अध्यादेश काढले आहेत.
आम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेऊन कामे करत आहोत. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे तातडीने पंचनामे करत आहोत.
आम्ही गतिमान आहोत. चांगल्या कामाला वेळ लावत नाही. म्हणूनच मी तीन मिनिटात या ठिकाणी 7 कोटींचा निधी दिला.
आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपये वाटण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde phone called from the programme to officer and nandurbar nagarpalika received 7 crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही