CM Eknath Shinde | ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण…‘ – एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल सभागृहात बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनेत (Shivsena) कसा अन्याय झाला, बंड का आणि कसे केले, अन्यायविरूद्ध पेटून उठण्याची शिकवण बाळासाहेबांनीच दिली होती, इत्यादी मुद्दे आपला भाषणात मांडत शिवसेनेवर जोरदार घणाघात केला होता. मुख्यामंत्र्याच्या या भाषणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, अशी टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रिक्षाच्या स्पीड पुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!‘ यासाठी MaharashtraFirst हा हॅशटॅग वापरला आहे.

 

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता.
तसेच, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, अशी बोचरी टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते शिवसेनाभवनात शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांच्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीत अनेक महिला पदाधिकार्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरेंनी महिला पदाधिकार्‍यांना यावेळी मार्गदर्शन केले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde tweet over shivsena uddhav thackeray statement on auto

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, रिक्षासह आठ दुचाकी जप्त (Video)

 

Devendra Fadnavis | शिंदे यांना थांबवून फडणवीसांच्या सभागृहातील भाषणावर शिवसेनेची टीका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ’राज’कारण; म्हणाले – ‘त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं…’