Homeक्राईम स्टोरीPune Crime | जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांकडून...

Pune Crime | जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, रिक्षासह आठ दुचाकी जप्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thieves) आणि वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रिक्षासह 8 दुचाकी आणि 5 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी (Pune Police) वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्याजवळील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रतिक बाळासाहेब खेडकर Prateek Balasaheb Khedkar (वय-19) यांचा मोबाईल दोन चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेला होता. याप्रकरणी प्रतिक खेडकर याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी फिर्यादी यांनी केलेल्या वर्णनाचे चोरटे साधु वासवानी चौकातील (Sadhu Vaswani Chowk) पेट्रोल पंपाजवळ दिसले. संशयावरुन ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या ताब्यातून 5 मोबाईल जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पी प्रेमकुमार ब्रह्म्या P Premkumar Brahmaya (वय-23), पी धनराज ब्रह्म्या P Dhanraj Brahmaya (वय-29), मधु वेंकट्या Madhu Venkatya (वय-55 तिघे रा. ग्रीन पार्क कॉलनी, हैदराबाद) यांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

वाहन चोर गजाआड
पुणे स्टेशन (Pune Station) जवळून रिक्षा चोरणाऱ्या गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून रिक्षासह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशाल मल्लिकार्जुन गायकवाड Vishal Mallikarjun Gaikwad (वय-29 रा. रांजणगाव ता. शिरुर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची रिक्षा 20 जून रोजी पुणे स्टेशन येथून चोरीला गेली होती. या गुन्याचा तपास करत असताना चोरीची रिक्षा शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टी येथे उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आनंद मल्लिकार्जुन माने Anand Mallikarjun Mane (वय-22 रा. कस्पटे वस्ती, वाकड) याला अटक केली. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त केल्या. आरोपीने भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station) आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच दिनेश नागु डोंगरे Dinesh Nagu Dongre (वय-32 रा. केशवनगर, पुणे) याला अटक करुन तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त आर.ए. राजे (ACP R.A. Raje),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar), पोलीस अंमलदार मोहन काळे,
प्रताप गायकवाड, हरिष मोरे, नितीन जगताप, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, ज्ञाना बढे, मनोज भोकरे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Bundgarden police seize 8 bikes, arrest 5 Thieves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी, पुणे एसीबीकडून FIR

 

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

 

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News