CM Eknath Shinde | अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | रायगड येथील खालापूरच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून (Raigad Irsalwadi Landslide ) झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनाग्रस्त जवळपास 18 ते 20 अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.

इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने (Dr. Shrikant Shinde Foundation) ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचे निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत असल्याचे ट्वीट मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe)
यांनी आज (शनिवार) इर्शाळवाडीला भेट देत या मुलांचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे समोर आले आहे.
नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला (22 People Died) आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत.
दरम्यान, दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अद्याप 86 जण अडकल्याची माहिती मिळत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर