CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाले. यावेळी 40 आमदार आणि 12 खासदारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना सोडली आणि भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. आता यांच्यापैकी अनेक आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) केला आहे.

शिंदे गटातील नाराज आमदारांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे सरकारला (Shinde Government) लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे यांच्या गटातील आमदारांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली. आपल्याला मंत्रिपदाची स्वप्ने दाखविली गेली. पण, ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आपला डाव कुठेतरी फसला असल्याची कबुली शिंदे गटातील आमदारांनी आपल्या मतदार संघात दिली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिंदे गटातील बहुतेक आमदार भाजपच्या (BJP) निशाणीवर म्हणजे कमळावर निवडणूक लढवणार की काय? अशी चर्चा त्यांच्या मतदार संघात सुरु आहे.
महाराष्ट्रात सत्तांतराचा डाव फसला आहे. ज्याप्रकारे शिंदे यांनी महाराष्ट्रात सत्ता काबीज केली,
ते जनतेला रुचलेले नाही. त्यामुळे नाराज आमदार आपला गट सोडून भाजपमध्ये सामिल होणार का? अशी भिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सतावत आहे, असे देखील तपासे म्हणाले.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच दावा करत आहे.
तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी पक्ष फुटून त्यांचे
आमदार भाजपमध्ये येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कोण कोणावर नाराज आहे, हे जनतेला कळत नाही.
आगामी काळात या सर्व गोष्टी लोकांना कळतील. तोपर्यंत राजकीय बदल आणि रोजच्या घडामोडी पाहणे सर्वांना
प्राप्त आहे.

Web Title :- CM Eknath Shinde | ncp spoke person mahesh tapase on shinde group upset mla join to bjp 2024 assembly election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे ‘एका दगडात दोन पक्षी’, गडचिरोलीत नक्षलवाद्यांना इशारा देताना उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा

Gunaratna Sadavarte | ‘सामना’वर बंदी आणण्याची सदावर्ते यांची आरएनआयकडे मागणी, ‘या’ कारणावरून केला आरोप