Gunaratna Sadavarte | ‘सामना’वर बंदी आणण्याची सदावर्ते यांची आरएनआयकडे मागणी, ‘या’ कारणावरून केला आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून समावून घ्यावे, या मागणीसाठी रान उठवणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आता शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) काळात शांत का, असा सवाल सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र, सदावर्ते (Gunaratna Sadavarte) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी ते एसटी कर्मचार्‍यांसाठी (ST Employees) नव्हे तर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र ‘सामना’च्या (Saamana) विरोधात उभे टाकले आहेत. सामना वर्तमानपत्रावर बंद घालावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. ‘सामना’तून रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांचे अप्रत्यक्षपणे खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सामनातून केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकारवर (State Government) विविध मुद्द्यांवरून प्रहार केले जातात. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचे हे मुखपत्र असल्याने सर्वच माध्यम आणि राजकीय पक्ष सामनातील मजकुराची दखल घेताना दिसतात. फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट दिली आहे. मात्र, याचाच आधार घेत गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सदावर्ते यांनी आरएनआय RNI (रजिस्टार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया) कार्यालयाकडे आणि गृहमंत्रालयाकडे मागणी केली आहे की, रश्मी शुक्ला यांचे सामनातून अप्रत्यक्ष नाहीतर प्रत्यक्ष खच्चीकरण केले जात आहे. दैनिक सामना बंद झाला पाहिजे. तसेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगकडे (National Commission for Women) सुद्धा तक्रार केली आहे.

सदावर्ते यांच्या या मागणीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सामनावर कोणी बंदी आणू शकत नाही. त्यांना शिवसैनिक आणि न्यायालयीन
लढाईशी सामना करावा लागेल. ज्याला प्रसिद्धी हवी आहे, त्याने फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
आणि ‘सामना’वर बोलायचे हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे.
आता विरोधक सामनावर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Web Title :- Gunaratna Sadavarte | gunratna sadavarte demand ban shivsena mouthpiece saamana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

Devendra Fadnavis | ‘…तेव्हाच मला राग येतो’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं