CM Eknath Shinde on Onion | शरद पवारांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करावं, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; पंतप्रधानांचे मानले आभार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde on Onion | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पेटलाय. निर्यात शुल्कामुळे (Export Duty) महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. राज्यातील वेगवेगळ्या भागात निदर्शनं करत, रास्तारोको करत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने (Central Government) 2410 रुपयांचा भाव देऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) तसेच अमित शाह (Amit Shah) आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचे आभार मानले आहेत. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Onion) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांच्याबरोबर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार. नाफेडने (Nafed) दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्दारित 2410 रु. प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. (CM Eknath Shinde on Onion)

केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल

मी देखील अमित शाह आणि पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमची केंद्रासोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

शेतकरी अडचणीत येतो, त्यावेळी सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आजपर्यंत आपण पाहिलं आहे.
जेव्हा अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, त्यावेळी सरकारने सर्व नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आता मोठ्या संकटात देखील दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शरद पवारांवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांवर (NCP Chief Sharad Pawar)
निशाणा साधला आहे. केंद्राने ऐतिहासिक निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय.
राज्य सरकार (State Government) देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता,
शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती,
तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने (Modi Government) मदत केली.
त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे,
असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न