CM Eknath Shinde | ‘…तेव्हा कळेल’, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East by-Election) भाजपने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना मोठे बळ मिळाले. भाजपच्या मुरजी पटेल (BJP Murji Patel) यांनी माघार घेतली असली तरी सात उमेदवार रिंगणात असल्याने 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या माघारीनंतर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेलाही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सोमवारी भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचं काम भाजपने केले आहे. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यावरही त्यांनी एका वाक्यात पलटवार केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Election) जवळच आली आहे, तेव्हा कोण हरतो आणि कोण जिंकतो ते कळेल, असे शिंदे म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती.
मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) त्यांना हजर करण्यात आले होते.
त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, भाजपला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता.
तर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती.
भाजपने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागत्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला,
अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Web Title :- CM Eknath Shinde | then you will know chief minister eknath shindes response to sanjay rauts criticism on andheri byelection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका