Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने (BJP) अंधेरी पूर्वची पोटनिवडणूकीतून (Andheri East by-Election) माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता यावरुन शिंदे गट (Shinde Group)-भाजप आणि ठाकरे गटात (Thackeray Group) होणारे आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरुच आहेत. दरम्यान भाजपने माघार घेतल्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच, अशा शब्दात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सामानतील टीकेचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका बसला

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महारष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील, अशी टीका ठाकरे गटाने सामनामधून केली आहे.

“गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच…

ठाकरे गटाने केलेल्या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले! अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ, असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच एक नंबर आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरुन न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो.
नाही तर पेंग्विन सेना… घरात बसून ‘गणपत वाण्या’ सारखी नुसतीच स्वप्न बघणार,
असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar replied to samana editorial on bjp and shinde group andheri by election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’