CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नीती आयोगाच्या (NITI Aayog) नियामक परिषदेची रविवारी (दि.7) बैठक झाली. या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शेवटच्या तिसऱ्या रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठी जनांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे.

 

रोहित पवार यांनी बैठकीनंतर काढण्यात आलेला फोटो ट्विट करुन म्हटले की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दु:ख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकारने घ्यावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 

रोहित पवार यांच्यासह इतर अनेक जणांनी हा फोटो ट्विट करुन आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी फिल्मी स्टाईल पासून एकनाथ शिंदेंच्याच आधीच्या वक्तव्यांचाही संदर्भ दिल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या फोटोसंदर्भात सोशल मीडियावरील चर्चा जाणून घ्या…

https://twitter.com/Anuj_Speaks27/status/1556325956671111168?s=20&t=vp3Xb4pitJ7kBlkB23Gjrw

रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटवरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर उदय सामंत म्हणाले, फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते. याच्या आगोदरचा एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या शपथविधीच्याकार्यक्रमात शिंदे पहिल्या रांगेत होते, अशी आठवण सामंत यांनी करुन दिली. राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत पंतप्रधान मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपले दुर्दैव आहे, असे म्हणत रोहित पवारांना टोला लगावला.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा