Video : इलेक्ट्रिक स्कूटरने चालविताना गडबडल्या ममता बॅनर्जी; सुरक्षा कर्मचार्‍यांची वेळीच वाचविलंलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्याचा पर्याय स्वीकारला. डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी ह्या हावडामध्ये मोर्चात सामील झाल्या. यावेळी त्याने इलेक्ट्रिक स्कूटर देखील चालविली. यावेळी ई स्कूटर चालविण्याचा प्रयत्न करताना त्या पडल्या असत्या. मात्र, वेळीच सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना वाचविलं.

ममता बॅनर्जी याच्याभोवती तैनात सुरक्षा कर्मचारी आणि नेत्यांनी वेळीच त्यांना स्कूटरवरून पडण्यापासून वाचवले. यावेळी त्याचा मोबाईल रस्त्यावर पडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकता की ममता बॅनर्जी ह्या ई स्कूटर चालविताना त्यांचा कसा तोल गेला आहे ते. ममता बॅनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर राज्य सचिवालय येथे जात असताना ही घटना घडली.

पश्चिम बंगालमध्ये यंदा मार्च ते मे दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारला घेराव घालण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात निदर्शने झाली आहेत.

ई स्कूटरवर ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात घोषणा दिल्या. त्यांनी हेल्मेट घातले होते आणि राज्य सचिवालय पर्यंतचा सुमारे सात किलोमीटरचा प्रवास केला होता. यावेळी त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांना हात हलवून अभिवादन करत होत्या.

सुमारे 45 मिनिटांच्या प्रवासानंतर ममता बॅनर्जी नबान्न येथे आल्या, तर भाजपप्रणित केंद्र सरकारवर टीका केली. तसेच त्या म्हणाल्या, आम्ही इंधनाच्या किंमती वाढविण्यास विरोध करीत आहोत. नरेंद्र मोदी सरकार केवळ खोटी आश्वासने देतात. त्यांनी इंधनाची किंमत कमी करण्यासाठी काहीही केले नाही. मोदी सरकारच्या आणि आताच्या पेट्रोलच्या किंमतींमध्ये असलेला फरक आपण पाहू शकता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदी सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून ममता बॅनर्जी यांनी आवाज उठविला. या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं.