मुख्यमंत्र्यांची समयसूचकता : म्हणून नाकारला पुष्पगुच्छ 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. यावरून मुख्यमंत्र्यांची  प्लास्टिक बंदी वरील जागरूकता दाखून दिली आहे.

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते

सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनचा ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पहिला पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते, यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  विशेष सत्कार करण्यात येत होता. मात्र

पुण्यात सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पहिला पदवीदान समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना माधुरी मिसाळ त्यांना पुष्पगुच्छ देत होत्या.त्या पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.

रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण असल्याने मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ न स्वीकारून प्लास्टिक बंदीबाबत असलेली जागरुकता दाखवून दिली आहे.  सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या कार्यक्रमात महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन कलमळकर यांची उपस्थिती होती.