
CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला भावनिक आवाहन; म्हणाले – ‘कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, समोर या बसून मार्ग काढू’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – CM Uddhav Thackeray | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. जवळपास पन्नास आमदार शिंदे गटात असल्याने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) देखील धोक्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आवाहन करत म्हटलं आहे की, “आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल.”
“आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका,
शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे.
समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.
Web Title :- CM Uddhav Thackeray | maharashtra political crisis cm uddhav thackeray appeals emotionally to all the mlas in guwahati who rebelled against shivsena with eknath shinde
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update