Coastal Road Projects | वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम पाडले बंद; आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coastal Road projects | शिवसेनेचा आणि मुंबई महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला (Coastal Road projects) वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. आज (शनिवारी) वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडण्याची भुमिका घेतली आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला. त्यावेळी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे.

 

मच्छिमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले आहे. यावेळी मच्छिमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. तसेच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री आहेत त्यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात असे कसे चालेल. आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांना घेऊन येतो तुम्ही तुमचा प्रकल्प करा आणि आम्हाला मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्थानिकांनी दिली.

दरम्यान, कोस्टल रोड प्राधिकरणाने (Coastal Road Authority) परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे.
तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर (Coastal Road Projects) नुकसान झाले.
त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी समुद्रात काम सुरु असलेल्या बार्जवर जाऊन काम बंद पाडले आहे.

 

यापुर्वी मच्छिमारांनी समतोल भूमिका घेत याबाबत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती.
पण आता प्राधिकरणाच्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे.
जो पर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका स्थानिक मच्छिमारांनी घेतली आहे.

 

Web Title :- Coastal Road Projects | criticizing aditya thackeray locals stopped work on coastal road in worli koliwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati Crime | फाइलमागे 5 हजार रुपयांची मागणी; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ

MP Sanjay Raut | ‘आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी…’

Jan Dhan Accounts | खुशखबर ! SBI च्या ‘या’ ग्राहकांना मोफत मिळताहेत 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?