MP Sanjay Raut | ‘आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MP Sanjay Raut | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आज पुण्यात (Pune) आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाने (PUWJ) आयोजित कार्यक्रमात राऊत यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अनेक पैलुवर भाष्य केलं आहे. नाशिकमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Shiv Sena and NCP) वादावर भाष्य करताना थेट राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लक्ष्य केलं आहे. भुजबळ यांनी नाशिकमधील वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्णय घेतील, इतरांनी भाष्य करू नये असं म्हटल्याचं राऊतांच्या लक्षात आणून दिलं. त्यावर राऊत यांनी छगन भुजबळ यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

 

त्यावेळी संजय राऊत म्हणाले, आघाडीत सुरू असलेले पेल्यातील वादळं आघाडीला अडचणीत आणत आहेत का या सवालावर संजय राऊत म्हणाले,
“नाशिक मधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे (Chhagan Bhujbal and Suhas Kande) वाद मिटेल.
आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी येतात ती मोठी येतात.
छगन भुजबळ महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते, वरिष्ठ मंत्री आहेत. कधीकाळी ते शिवसैनिक होते. त्यांच्या ती रग अजूनही आहे.
सुहास कांदे यांच्यातही आमदार म्हणून तशी रग आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखावा. एक आमदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत.
त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, असं राऊत म्हणाले.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं सांगताना इतरांनी लक्ष घालू नये असं म्हटलं. यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही कुठं लक्ष घालतो.
त्यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरतायेत. छगन भुजबळ यांच्याशी माझा चांगला संवाद आहे. तुम्ही नाशिकचा प्रश्न इथं का आणता? हे पुणे आहे, पुण्याविषयी बोला.
असं त्यावेळी राऊत म्हणाले.

 

Web Title : MP Sanjay Raut | MP sanjay raut criticize ncp leader chhagan bhujbal over nashik party dispute in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jan Dhan Accounts | खुशखबर ! SBI च्या ‘या’ ग्राहकांना मोफत मिळताहेत 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Gold Price Today | धनत्रयोदशी 2021 पूर्वी सोने झाले 1100 रुपये महाग, चांदीत 4900 रुपयांची तेजी

IND vs NZ : विराट कोहलीने शमीला ट्रोल करणार्‍यांना फटकारले, म्हणाला – ‘धर्मावरून निशाणा बनवणे तुच्छता’