स्तुत्य उपक्रम ! अंध, अपंग व गरजूंना 500 धान्य किट वाटप

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे अशावेळी त्यांच्या अडचणीत थोडी मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडू गावडे यांच्या वतीने थेऊर मधील ५०० अंध, अपंग व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

गेली एक ते दीड महिन्यापासून अनेक नागरिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने घरचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे अशावेळी आपल्याकडून काही मदत व्हावी या उद्देशाने मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठण चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे व मंगल गावडे यांनी गरजू तसेच अंध व अपंग नागरिकांना धान्याचे किट वाटण्यात आले तर कोरोना काळात आरोग्य विभागासोबत काम करणाऱ्या आशा सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपये व धान्य किट देण्यात आले यावेळी गावच्या सरपंच शीतल काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, युवराज काकडे, दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट, संजय कुंजीर,शरद काकडे, देविदास गावडे, कालिदास गावडे, दत्ता गावडे, सचिन राऊत, दादा गुरव आत्माराम खेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत अनेक जण मदतीला पुढे आले होते तर शासनाने जवळपास ७० ते ८० टक्के नागरिकांना रेशन उपलब्ध करून दिले होते परंतु या दुसऱ्या लाटे दरम्यान सर्वसामान्य माणसाला लॉकडाऊन मूळे घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला महागाईने उचांक गाठला आहे. पहिल्या लाटेत सुद्धा खंडू गावडे यांनी धान्य किट व आर्थिक मदत केली होती.