भद्रावती येथे नृत्य परिषदेची समिती गठीत

भद्रावती – राज्याच्या कानोकोपऱ्यात विखुरत्पेल्या नृत्य कलाकारांना संघटित करून त्यांना दिशा द्यावी व भविष्यात त्यांना शासनाचे सर्व सुविधा व सवलती मिळून न्याय मिळावा या हेतूने स्थानिक हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नृत्य परिषदेच्या एका बैठकीत भद्रावती तालुका समिती गठीत करण्यात आली.

या समितीत तालुका संघटक सागर मामीडवार, उपाध्यक्ष, महेंद्र सरस्वती, कोषाध्यक्ष, विजय श्रीवास, महिला प्रमुख कु. सुप्रिया चहांदे, प्रसिद्धी प्रमुख रोहित तुराणकर यांची निवड बिनविरोधपणे करण्यात आली. सदर बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सागर अंदनकर, सचिव राजेश कैथवास, कोषाध्यक्ष मृणालिनी खाडिलकर-गंगशेट्टीवार प्रसिद्धी प्रमुख राज सिंग तसेच जिल्हा प्रमुख मानस रामटेके, नियोजन प्रमुख अंतबोध बोरकर, महिला प्रमुख सौ सुमना बॅनर्जी, पालक प्रमुख नंदू गुरुंग, प्रशांत कत्तुरवार आदी मान्यवर उपस्थित होते. सदर परिषदेची प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे संचालन मोहन येमुरले यांनी सदर बैठकीला तालुक्यातील सर्व नृत्य कलाकार उपस्थित होते. बैठकीला यशस्वीतेकरीता शहरातील नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकारांनी परिश्रम घेतले.