गृह राज्यमंत्री केसरकरांविरोधात सामुहिक बलात्कारातील पीडित महिलांची तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या बलात्कार पीडित मायलेकींना हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. केसरकर यांना भेटण्यासाठी त्या दोघी मंत्रालयात गेल्या असता केसरकर यांनी त्यांना हाकलून दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’043681b1-cc49-11e8-8050-4902a5657a01′]

दोघी मायलेकी आपली तक्रार घेऊन केसरकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या असता केसरकर यांनी हाकलून दिल्याचा खळबळजनक आरोप या पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुमची लायकी काय आहे, जास्त बोलायचे नाही, असे म्हणत केसरकरांनी दालनातून हाकलून दिल्याचे या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. पीडित मायलेकींवर मे २०१७मध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. अशा गंभीर प्रकरणाचीही दखल न घेता पोलिसांनी तब्बल दीड महिन्यानंतर तक्रार नोंदवली. पण स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल केला होता. आता आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात असून, न्याय मिळण्यासाठी पुन्हा केसरकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हाकलून दिल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.

नगरचा छिंदम, मुंबईचा कदम ही भाजपची संस्कृती : अशोक चव्हाण

कमी पर्जन्यमानाच्या भागांचे दौरे करा : मुख्यमंत्री

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून, या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आणि त्या जिल्ह्यातील मंत्र्यांना दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच दुष्काळाबाबत केंद्र सरकारने निकष बनविले असून, त्यानुसार माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील पिकेही धोक्यात आली आहेत. या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा मंत्री तसेच पालकमंत्री घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. सन २०१६च्या मॅन्युअलमध्ये केंद्राने याबाबत निकष तयार केले आहेत. त्यानुसार माहिती जमा करण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab937ae2-cc4c-11e8-81bd-cbff2c4043a2′]