साहेब, बायको घरात कोंडून लाटण्याने आणि काठीने मारते हो !

फैजुल्लागंज (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – पत्नीवर अत्याचार करण्याबाबादच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. मात्र, आता तर चक्क पत्नीच्या जाचामुळे चक्क पती तक्रार करत आहेत. ऐकून विश्वास बसत नाहीय ना असं खरोखर घडतय. उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या समुपदेशन केंद्राकडे ताशा तक्रारी देखील येत आहेत. साहेब, बायको घरात कोंडून लाटण्याने आणि काठीने मारते हो ! विरोध केला तर आई आणि छोट्या बहिणींना देखील मारते. अशी तक्रार उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या समुपदेशन केंद्राकडे अली आहे. लखनऊमधील ठाकुरगंज येथील एका तरुणाची त्याच्या बायकोविषयीची तक्रार आहे. त्याने तक्रारीत असा आरोप केलाय की  माझी बायको माझ्यासह सगळ्या घरचाच छळ करीत आहे, गेल्या काही दिवसात बायकोकडून होणाऱ्या छळाविरोधात पती पोलीस समुपदेशन केंद्राचा दरवाजा ठोठावतोय.

चारित्र्याचा संशय घेत मारते पत्नी

तो म्हणाला आमचं लग्न होवून २१ वर्षे झाली सगळं काही सुरळीत सुरु असतांना अचानक माझी बायको संशयखोर झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरात सतत वाद करत असते. एके दिवशी तर तिने चक्क काहरच केला. तिने मला काठीने इतकं मारलं की माझा यात हातच तुटला. आई वडील दोघेही वयस्कर आहेत त्यांना व्यवस्थित जेवणही देत नाही. समुपदेशन केंद्रात सुद्धा तिने मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार आहे फैजुल्लागंज येथील एका व्यक्तीची.

हँडसम झाला तरच करेन तुझ्याशी संसार

बल्दीखेड्यातील युवकाची तक्रार तर धक्कादायक आहे.त्याच मोहद्दीपुर मधील एका मुलीशी २१ जून रोजी लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनीच बायको माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर ती आता परत येत नाही. परत न येण्याचं कारण विचारलं तर तिने तुम्ही सुंदर दिसत नाही असे कारण दिले.आणि म्हणाली आधी चांगले दिसायला लागा,चांगले हँडसम दिसा त्यानंतर मी परत येईल.

आता दोघांचं देखील समुपदेशन सुरू आहे. समुपदेशन केंद्राच्या प्रमुख बबिता सिंह म्हणाल्या, महिलांचे समुपदेशन करतांना अनेक अडचणी येतात. अनेकदा काही महिला पतीचं ऐकूनच घेत नाही.त्यांना समजूनही घेत नाहीत अशावेळी त्यांचं समुपदेशन करतांना फार अडचणी येत असतात.

मागील काही वर्षांपासून पत्नीकडून पतीचे होणारे शोषण या विषयीच्या तक्रारीत वाढ झाली आहे. २०१६ साली या प्रकारच्या १९ तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यात  २०१७ साली २१ तक्रारीत वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी हा आकडा ४१ पर्यंत गेला आहे.