Conduct Elections On Ballot | EVM विरोध आता गावपातळीवर! सांगलीतील ‘या’ गामपंचायतीचा ठराव, ‘निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या’

सांगली : Conduct Elections On Ballot | देशभरात ईव्हीएमवर निवडणुकांचे मतदान घेण्यास विरोध वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत या मागणीसाठी मोठे आंदोलन झाले. तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टातील काही वकिलांनी सुद्धा आंदोलन केले होते. आता हा विरोध देशभरातील ग्रामीण भागात देखील पोहचल्याचे दिसत आहे. (EVM Machine)

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर आगामी निवडणुकांचे मतदान घेण्याचा ठराव घेण्यात आला. (Conduct Elections On Ballot )

शेटफळे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या. यावेळी, आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला.

ग्रामसेवक आर. एम. कोळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी
मतपत्रिकेवर घेण्याचा ठराव मांडला. त्यास एकमताने पाठिंबा देत मंजुरी देण्यात आली.

शेटफळे येथील बाजार पटांगणात ही ग्रामसभा झाली. यावेळी माजी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. सी. पी. गायकवाड,
उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, माजी उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : फेक कॉल केल्याच्या संशयावरुन उबेर चालकाकडून तरुणाला मारहाण, तिघांवर FIR

पिंपरी : जुन्या केसच्या कारणावरुन दोघांमध्ये मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

तळेगाव दाभाडे : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सलून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

ब्लॅकमेलच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विवाहित महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Nagpur Police News | पुण्यापाठोपाठ नागपुरातही गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांसमोर परेड; दिला कायद्याचा डोस, गडबड केल्यास कठोर कारवाईचा इशारा

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार