Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याचा प्रकार उंड्री परिसरात घडला आहे. याप्रकरणी 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.6) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 43 वर्षीय आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन साहेबराव धर्माजी घायतडके (वय-65 रा. बिबवेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 7 वर्षाची मुलगी लिफ्टमधून जात होती.
त्यावेळी लिफ्टमध्ये आरोपीने मुलीला जवळ बोलवून घेतले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचे लैंगिक शोषण केले.
तसेच तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.
पीडित मुलीने याबाबत आईला सांगितले असता त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

Pune PMC News | हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर पुणे पालिकेची कारवाई

‘गॅस रीफिलिंग’ करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांकडून अटक

देशी कट्टा बाळगणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, कट्टा व एक काडतुस जप्त

बंडगार्डन, हडपसर परिसरातील अपघातात दोन जणांचा मृत्यू

किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण; येरवडा परिसरातील घटना

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली