Nagpur Police News | पुण्यापाठोपाठ नागपुरातही गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांसमोर परेड; दिला कायद्याचा डोस, गडबड केल्यास कठोर कारवाईचा इशारा

ADV

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन नागपूर पोलीस दलाचे (Nagpur Police News) पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पुणे शहर पोलीस दलात पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सलग दोन दिवस शहरातील गुंडाची आयुक्तालयात परेड घेतली. त्याच्या पाठोपाठ आता नागपूरातही नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल (IPS Dr. Ravindra Kumar Single) यांनी ३१७ गुंडांची पोलीस आयुक्तालयात परेड करण्यात आली. पुढील काळात कायदा हातात घेऊन कुठलाही गुन्हा केल्यास कठोर कारवाई करण्याचा या गुंडांना इशारा देण्यात आला.

पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. सिंगल यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सक्रीय गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात ३१७ सक्रीय गुन्हेगार बुधवारी हजर झाले. प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची नजर असल्याचे तसेच यापुढे कोणत्याही गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास कठोर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला. मोका, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईचा इशारा या गुंडांना देण्यात आला.

ADV

पोलिसांनी २००८ पासूनच्या गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे.
पोलीस आयुक्तालयात हजर असलेल्यामध्ये अनेक नामचीन गुंड, खूनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची संख्या अधिक होती.
पोलिसांनी या सर्व गुन्हेगारांची डाटा बँक तयार केली आहे. त्यांच्यावर हालचालीवर नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सावकारांविरोधात मोहिम
सावकार कर्ज देण्याच्या नावाखाली गरजवंताचे रक्त शोषणाचे काम करतात.
अशा बेकायदा सावकारी करणार्‍यांविरुद्ध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली