Congress Ashok Chavan | अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेत्यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Congress Ashok Chavan | महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (Maharashtra Congress In Charge H. K. Patil) आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू (State Election Officer Pallam Raju) यांनी मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या (Congress) नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीसाठी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्यासमोर तक्रार करत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असले, तरी प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. (Congress Ashok Chavan)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan), माजी मंत्री सुनील केदार (Former Minister Sunil Kedar), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एच. के. पाटील, पल्लम राजू यांची भेट घेऊन पटोलेंविरोधात तक्रार करताना अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करावे अशी मागणी केली. नाना पटोले यांचे संघटनावाढीकडे दुर्लक्ष झाले असून, ते कुणालाही विश्वासात न घेता कुणाच्याही नियुक्त्या करतात अशा तक्रारी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आल्या. तसेच जर अशोक चव्हाण यांचा पक्षाने सन्मान करत त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले तर महाराष्ट्रात पक्षाच्या जागा वाढतील, पक्ष मजबूत होईल, असा आशावाद या नेत्यांनी व्यक्त केला. तसेच या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले. (Congress Ashok Chavan)

या बैठीकीत घेतलेले निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनाच नियुक्त करण्याचा ठराव नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेसच्या राहुल गांधी यांना बिनविरोध अध्यक्ष करावे,
या ठरावाच्या बाजूने आज मतदान न करता आपला विरोध दर्शविला.

Web Title :- Congress Ashok Chavan | make ashok chavan the state president leaders are angry with patole

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | NDA त लष्करी अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात; इव्हेंट मॅनेजमेंट करणार्‍याने लष्करी गणवेश घालून केला फसवणुकीचा प्रयत्न

Sanjay Raut On Shivsena Dasara Melava | “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…” दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी

Pune Crime | पैसे परत करण्याचा तगादा लावणार्‍या 7 जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील 4 सावकारांना अटक