स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान : मोहन भागवत

दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले आहेत. तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान होते. असे वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. दिल्ली येथे संघाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय अधिवेशनात ते बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असेही ते म्हणाले.
[amazon_link asins=’B07DC7CQ88,B00B24DKFK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87de1f34-ba93-11e8-b040-0f1d8fc62d4a’]

ते म्हणाले, आपण तिरंग्याचा सन्मान करतो आणि आपण देशासाठीच जगले पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहणार. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवते. संघाला लोक समजू शकत नाहीत. कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे, याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. फक्त आम्ही आपले कार्य करतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिल्लीत तीन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ‘भविष्य का भारत : RSS दृष्टिकोण’ नावाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. प्रारंभी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्याबाबत उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, संघाचे कार्य अद्वितीय आहे. या कार्यक्रमाला देशातील विविध भागातून विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेता रवी किशन, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर आदी उपस्थित होते.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी