भगवद् गीतेपेक्षा संविधानाचे वाटप केलेले चांगले : रिपब्लिकन विद्यार्थी सेना 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई आणि उपनगरातील ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये  A / A +  ग्रेड प्राप्त आहेत, अश्या १०० महाविद्यालयांमध्ये आता भगवद् गीतेचे वाटप होणार आहे. यासाठी १०० भगवद् गीतेचे संच संबंधित महाविद्यालयांमध्ये वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यातआले आहेत. याबाबत उच्च शिक्षण विभागाने एक परीपत्रकही जारी केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयानंतर त्यांना अनेक नव्या वादाला तोंड देण्याची वेळ येईल असे वाटत आहे.
[amazon_link asins=’B07F23BWLZ,B01591HVK6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d3346cc-85b5-11e8-a32f-7588ee792ce6′]

उच्च शिक्षण मंडळाच्या या निर्णयावर अनेक संघटना नाराज झाल्याचे दिसून येतआहे. या निर्णयावर विध्यार्थी सेनेने आपले मत मांडले आहे. विध्यार्थी सेनेने पत्रकारांशी संवाद साधतांना म्हंटले आहे की, राज्य उच्च शिक्षण विभागाने विध्यार्थ्यांमध्ये भगवद् गीतेचा प्रचार आणि प्रसार करायचे ठरवलेले दिसत आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षतेचे वातावरण असायला हवे. शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे संस्थांमध्ये वादाचे आणि जातीभेदाचे प्रमाण वाढू शकते, या निर्णयावर सरकारने  पुन्हा एकदा विचार करायला हवा.

इतकेच नव्हे तर, जर उच्च शिक्षण विभागाने भगवद् गीते  ऐवजी संविधानाचे वाटप केले असते तर चांगले झाले असते , विध्यार्थाना देशाच्या संविधानाविषयी अभ्यास झाला असता, सरकारने  हा निर्णय योग्य विचार न करताच घेतला आहे. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यावा असे रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष गाडे यांनी म्हंटले आहे.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2501478-85b6-11e8-825e-550288e197f9′]