डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरुन पुन्हा वादंग

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकर स्मारकाच्या उंचीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीही नियोजित स्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्मारकाच्या उंचीवरुन पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11d49000-c70f-11e8-be7d-7f43dec97cd7′]

नुकतीच स्मारकाचे शिल्पकार राम सुतार, एमएमआरडीएच्या अधिकारी आणि वास्तू विशारद शशी प्रभू यांची वांद्य्राच्या एमएमआरडीए कार्यालयात बैठक झाली होती. बैठकीत स्मारकाच्या उंचीबाबत रामदास आठवले यांनी नारीजी व्यक्त करत स्मारकाच्या उंचीबाबत पुन्हा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. तसेच आनदराज आंबेडकर यांनीही आज स्मारकाला विरोध केला आहे.

दोन दिवसांपुर्वी इंदू मिलच्या नियोजित जागेवर आनंदराज यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्मारकात मुख्य पुतळ्याची उंची ३५० फुट ठरवण्यात आली होती. मात्र आता चबुतरा १०० फुट आणि मुख्य पुतळ्याची उंची २५० फुट करण्यात आली असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकर स्मारकाच्या उंचीवर आक्षेप घेतल्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीही या नियोजित स्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्मारकाच्या उंचीवरुन पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1bd264c3-c70f-11e8-8264-53db44e969d4′]

आनंदराज आंबेडकर म्हणाले, अमेरिकेतील प्रसिद्ध “स्टॅचू ऑफ लिबर्टी” च्या धर्तीवर हे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची आंबेडकरी अनुयायांची इच्छा आहे. सरकारने पुतळ्याची उंची कमी न करता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे. आंबेडकरी अनुयायांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नियोजित स्मारकाच्या नव्या सादरीकरणात मध्यभागी बाबासाहेबांचा २५० फूट उंच कास्यंपुतळा, तर चबुतऱ्याची उंची १०० फूट आहे. पुतळ्याचा चबुतरा कमळाच्या फुलाच्या आकाराचा बनवण्यात येणार असून चबुतऱ्यामध्ये ग्रंथालय, सभागृह आणि कलादालन, तर तळात वस्तुसंग्राहालय असणार आहे. तब्बल आठ हॉल असलेल्या या वस्तुसंग्राहलयात बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत सर्व पैलू चित्रित करण्यात येणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोकं येण्याची शकता गृहीत धरुन तळघरात तब्बल ४५० वाहनांसाठी पार्किंग करण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा इतिहास पाहता इंदु मिलमध्ये असणाऱ्या तळ्यावर महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष प्रारुप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B01N407G2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’237c5eaf-c70f-11e8-b78b-9dc487ff433d’]

दरम्यान, नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकाची एकूण उंचीबाबत अद्याप सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र मुख्यमंत्री लवकरच याचा खुलासा करतील असे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जाहिरात