जात-धर्म पाहून पोलीस काम करत नाहीत, टीका करणं अयोग्य : HM अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस कोणताही धर्म किंवा जात पाहून करत नाहीत. आवश्यकतेनुसार पोलीस मदत करतात. पोलीस कोणाचाही शत्रू नाहीत, तर पोलीस शांतता आणि सुव्यवस्थेचे मित्र आहेत. त्यामुळे पोलिसांचा सतत सन्मान केला पाहिजे, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना केले आहे.

दिल्ली पोलिसांच्या वतीने आज 73 व्या रेजिंग डे परेडमध्ये अमित शहा बोलत होते. यावेळी पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत म्हणून आपण त्यांच्यावर फक्त टीका किंवा गुंडासारखे त्यांना लक्ष करणे योग्य नाही. पोलिसांचे काम समजून घेतले पाहिजे, असेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले. अमित शहा पुढे म्हणाले, आपल्यासाठी अनेक सण-उत्सव असतात. मात्र पोलिसांसाठी प्रत्येक उत्सव हा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी असते. अशा जबाबदाऱ्यांसोबत ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्याप्रती सर्वांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे.

पोलिसांसाठी अनेक योजना राबवल्या
दिल्ली पोलिसांनी अनेक स्मार्ट योजना राबवल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी निर्भया फंड अंतर्गत डायल 112 आणि नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना केली आहे. पंतप्रधान मोदींनी 35 हजार जवान आणि पोलिसांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय पोलीस मेमोरियलची स्थापना केली असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.