धक्कादायक ! येत्या दोन आठवड्यांत दिवसाला 1000 कोरोना मृत्यू होतील; आरोग्य विभागाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर यावरूनच आता आगामी दोन आठवडे जास्त धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचेल तर दिवसाला १ हजार मृत्यू होतील, असा धोक्याचा स्पष्ट इशारा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात आठवड्याला कोरोना संसर्गाचं प्रमाण एक टक्क्याने वाढत आहे. तसेच सध्या असलेला २.२७ टक्के मृत्यूदर लक्षात घेता एकूण २८,२४,३८२ रुग्णसंख्येच्या ६४,६१३ इतके मृत्यू होण्याची शक्यता आहे. येत्या २ आठवड्यात दिवसाला १ हजार मृत्यूची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली असल्याचे समजते. सध्या महाराष्ट्रात ४१ टक्के पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी ८ टक्के गंभीर आहेत आणि ०.७१ टक्के व्हेंटिलेटरवर आहेत.

तसेच, अनेक जिल्ह्यांमध्ये उपचाराच्या योग्य सोयी सुविधा नाहीत. पुरेशा प्रमाणात नॉन ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर आहेत मात्र जवळपास चार हजार पेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज आहे. नागपूर आणि ठाण्याने जर त्यांच्या सुविधा वाढवल्या नाहीतर तर या रुग्ण वाढ आणि रुग्ण मृत्यूबाबतील या दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती खूपच गंभीर होईल. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या दरम्यान, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५,६४,८८१ च्या घरात पोहचली आहे. तर राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी तब्बल ३१,८५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच दिवशी ९५ रुग्णांचा बळी गेला आहे. तर आजपर्यंत आकडा ५३,६८४ इतका झाला आहे. तर सध्या २,४७,२९९ या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६१,१२५ त्याबरोबर नागपुर- ४७,७०७ आणि मुंबई- ३२,९२७ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४ एप्रिलपर्यंत राज्यात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह केसेस तीन लाखांपर्यंत पोहोचतील, शिवाय मृत्यूचा आकडाही पुढील ११ दिवसांत ६४ हजार च्या वर पोहोचेल असा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.