‘कोरोना’चा मार सोसत असलेल्या छोट्या उद्योगांच्या मदतीसाठी पुढे आले Google, भारतात करणार ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी एक चांगली बातमी आहे. गुगल भारतात लघु उद्योगांच्या मदतीसाठी 109 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना बनवत आहे. गुगलने म्हटले आहे की, ते भारतात कोरोना महामारीचा मार सोसत असलेल्या छोट्या आणि लघु उद्योगांना आधार देण्यासाठी 15 लाख डॉलर (जवळपास 109 कोटी रुपये) ची गुंतवणूक करतील. ही गुंतवणूक अमेरिकेच्या बाहेर छोट्या व्यवसायिकांना मदत करण्यासाठी गुगलच्या 75 लाख डॉलरच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

कंपनीने वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, आम्ही भारतात छोट्या आणि लघु उद्योजकांना आधार देण्यासाठी 15 लाख डॉलरची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही स्थानिक भागीदारांसोबत चर्चा करत आहोत. कंपनी विना-सरकारी भागीदारांसोबत काम करत आहे, ज्यांच्याकडे व्यवसायांना संसाधने प्रदान करण्याचा एक मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि ज्यांच्याकडे सामान्यपणे पारंपारिक कर्जदात्यांकडून दुर्लक्ष केले जाते.

मागील वर्षी जेव्हा महामारी आली होती, तेव्हा गुगलने छोट्या व्यवसायिकांना आधार देण्यासाठी 80 कोटी डॉलरच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून 20 कोटी डॉलरच्या गुंतवणूक निधीची घोषणा केली होती. गुगलने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, त्यांचा जगभरातील छोट्या व्यवसायिकांशी एक विशेष संबंध राहिला आहे आणि ते छोट्या उद्योगांचा आधार वाढवणे, इनोव्हेट करणे आणि नव्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यात मदत करते. कंपनीने म्हटले, आजच्या या घोषणेसह आम्हाला त्यांना एक नवीन आव्हानाला पूर्ण करण्यात मदत केल्याचा गर्व आहे.

मागील वर्षी जुलैमध्ये कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल फॉर इंडिया डिजिटलीकरण निधीची घोषणा केली होती, ज्याच्या माध्यमातून कंपनी भारताला डिजिटल बनवण्यात मदत करण्यासाठी पुढील पाच ते सात वर्षात 75,000 कोटी रुपये किंवा जवळपास 10 अरब डॉलरची गुंतवणूक करेल.