कोरोनाबाबत अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्सवर यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चेचा ईमेल ‘लीक’

वॉशिंग्टन/बिजिंग : संपूर्ण जगात कोरोना (Corona)  व्हायरसने कहर माजवला आहे. आतापर्यंत लाखो लोाकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत बनवण्याचा आरोप चीनवर होत आहे आणि या दरम्यान अमेरिकन महामारी तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची (Anthony Fauci ) आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांच्यावर चीनच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याचे आरोप झाले आहेत. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टला 866 पानांची ई-मेल चॅट सापडले आहे, ज्यावरून समजते की, डॉ. अँथनी फाउची सातत्याने चीनी शास्त्रांच्या संपर्कात होते आणि त्यांनी बिल गेट्स यांच्या व्हॅक्सीनबाबत चर्चा केली होती.

डॉ. अँथनी फाउची यांच्यावर मागील महिन्यात आरोप झाला होता की, त्यांनी चीनच्या वुहान लॅबला पैसे दिले होते आणि आता ईमेल लीक झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत की, डॉ. अँथनी फाउची सुद्धा या कटकारस्थानात सहभागी होते का? आणि त्यांना कोरोना व्हायरसबाबत सर्वकाही माहिती होते का? आणि त्यांनी कोरोना व्हायरस बनवण्यासाठी चीनी प्रयोगशाळेला पैसे दिले होते का?

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

 

डॉ. अँथनी फाउची यांचा ईमेल लीक
अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टकडे डॉ. अँथनी फाउची यांचे 866 पानांचे ईमेल चॅट आहे, ज्यावरून समजते की, डॉ. अँथनी फाउची यांचे चीनच्या महामारी एक्सपर्टशी जवळचे संबंध होते आणि ते चीनच्या टॉप महामारी एक्सपर्टसोबत सतत संपर्कात होते. रिपोर्टनुसार डॉ. एंथनी फाउची आणि चीनचे महामारी एक्सपर्ट डॉ. जॉर्ज गाउ, जे चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे डायरेक्टर आहेत, दोघांमध्ये कोरोना व्हायरस जगात पसरत असताना चर्चा सुरू होती. वॉशिंग्टन पोस्टने अनेक ईमेल सार्वजनिक केले आहेत, ज्यामध्ये मागील वर्षी एप्रिल महिन्यात डॉ. अँथनी फाउची आणि महामारी एक्सपर्ट डॉ. जॉर्ज गाउ यांच्यात चर्चा झाली आहे. या चॅटमध्ये डॉ. फाउची अतिशय मैत्रीच्या भाषेत डॉ. जॉर्ज यांच्याशी बोलत आहेत परंतु ते एकदाही कोरोना व्हायरसच्या आपत्तीबाबत चीनी एक्सपर्टला काहीही विचारत नाहीत.

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

 

लीक ईमेलमुळे प्रश्नच प्रश्न
मागील वर्षी मार्च महिन्यात चीनी एक्सपर्टने म्हटले होते की, अमेरिकन सरकार लोकांना मास्क लावण्यास सांगत नाही आणि ही सरकारची मोठी चूक असेल. यामध्ये त्यांनी अँथनी फाउची यांचे सुद्धा नाव घेतले होते. परंतु नंतर त्यांनी 28 मार्चला डॉ. अँथनी फाउची यांना मेल करत लिहिले होते की, मी तुमचा सायन्स इंटरव्ह्यू पाहिला…आणि ती पत्रकारांची भाषा होती. आशा आहे तुम्ही ती समजून घ्याल. चला सोबत मिळून आपण काम करूयात जेणेकरून पृथ्वीवरून हा व्हायरस नष्ट करता येईल. याच्या उत्तरादाखल डॉ. एंथनी फाउची यांनी लिहिले होते, मला सर्व समजत आहे. काही अडचण नाही. आपण सोबत मिळून काम करू. या उत्तराच्या बरोबर पुढील आठवड्यात डॉ. अँथनी फाउची यांनी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यास सुरूवात केली. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अगोदर म्हटले होते की, कोरोना व्हायरसविरोधात मास्क घालण्याची आवश्यकता नाही परंतु चीनच्या एक्सपर्टसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यास सुरूवात केली.

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

 

अँथनी फाउची-बिल गेट्स यांच्यात चर्चा
अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने डॉ. अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यात झालेली चर्चा सुद्धा सार्वजनिक केली आहे. दोघांमध्ये चर्चा कोरोना महामारी आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात झाली होती. एक एप्रिलला डॉ. अँथनी फाउची यांनी बिल गेट्स यांच्याशी टेलीफोनवर चर्चा केली होती. ज्यामध्ये ते बिल गेट्स-मेलेनिया फाऊंडेशनला कोरोना व्हायरस व्हॅक्सीन निर्मितीबाबत म्हटले होते. एका ईमेलमध्ये बिल गेट्स यांना डॉ. अँथनी फाउची म्हणतात की, त्यांनी सरकारसोबत मिळून काम केले पाहिजे.

READ ALSO THIS :

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

Pune : देहुरोडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार