Corona in Mumbai | मुंबईतील नवी रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर! मुंबईत आता लॉकडाऊन लागणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Coronavirus in Maharashtra) संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोना (Corona in Mumbai) संक्रमीत रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्यासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 नव्या कोरोना बाधितांची (Corona in Mumbai) नोंद झाली आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 79 हजार 260 वर पोहचली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊनचा (Lockdown) विचार करावा लागेल असे संकेत दिले होते. त्यातच आज रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर गेल्याने मुंबईत लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

मुंबईमध्ये बुधवारी (दि.5) 15,166 रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर आज (गुरुवार) यामध्ये 5 हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 29..90 टक्के इतका नोंदविण्यात आला असून, चाचणी केलेल्या 67 हजार नमुन्यांपैकी 20,181 नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्याचे बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. (Corona in Mumbai)

 

राज्यात 36 हजार 265 रुग्ण
दरम्यान, राज्यात तब्बल 36 हजार 265 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 907 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 65 लाख 33 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.17 टक्के झाले आहे. सध्या 1 लाख 14 हजार 847 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत 67 लाख 93 हजार 297 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

राज्यात ओमिक्रॉनचे 79 रुग्ण
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) देखील चिंता वाढवली आहे.
राज्यात आज 79 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 876 ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईत – 57, ठाणे – 7, नागपूर – 6, पुणे – 5, पुणे ग्रामीण – 3, पिंपरी चिंचवड -1 रुग्णांचा समावेश आहे.

 

 

Web Title :- Corona in mumbai | mumbai reports 20181 new cases of covid19 what about lockdown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक, ‘पिंपरी’ पोलिसांकडून सैन्यातून निवृत्त झालेल्या दोघांसह एजंट गजाआड

Aadhar Card बाबत नियमांमध्ये ‘हा’ बदल! जाणून न घेतल्यास लाभापासून राहाल वंचित

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 36265 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी