चाळीसगावच्या वैद्यकीय अधीक्षकांना ‘कोरोना’चा संसर्ग

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणही सुरु आहे. त्यानंतर आता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. यातील विशेष बाब म्हणजे डॉ. बाविस्कर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोसही घेतले होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अनेक डॉक्टरांनीही यामध्ये योगदान दिले होते. त्यापैकी डॉ. बाविस्कर हेही आहेत. डॉ. बाविस्कर यांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात गेल्या दहा महिन्यांपासून आघाडीवर होते. पण आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चाळीसगावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिली लस त्यांनीच घेतली होती.

दुसरा डोसही घेतला
कोरोना योद्धा डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी लसीकरणाच्या सुरुवातीला चाळीसगावातून पहिली लस घेतली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाचा दुसरा डोसही घेतला होता. लसीचे दोन डोस घेऊनही ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

लसीकरणाला मोठा प्रतिसाद
कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या देशभरात सुरु असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीत 5 हजारपेक्षा जास्त कोरोना योद्धांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले असून, अद्यापही लसीकरण सुरुच आहे.