Maharashtra : वर्षभरात 3 हजार कैद्यांना कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढत आहे. आता कोरोना विषाणूने कारागृहात सुद्धा शिरकाव केला आहे. पूर्ण राज्यात असणाऱ्या कारागृहांतील कैदी ३५ हजार इतके आहेत. त्यातील ५७ हजार ३२ कैद्यांची कोव्हीड टेस्ट केली त्यामधील ३ हजार ९७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील २ हजार ८८७ कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कारागृह विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यातील विविध कारागृहातील कैद्यांची संख्या अधिक झाली आहे. तात्पुरत्या कारागृहांचा मोठा उपयोग झाला. बाधित कैद्यांच्या आहारावर विशेष लक्ष देण्यात आले. वर्षभरात राज्यातील कारागृहात ७ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील प्रमुख मध्यवर्ती कारागृहात ५ कोरोना बाधित कैद्यांचा, तसेच धुळे येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याचा, तर सोलापूर जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. काही कैदी गुन्हा सिद्ध झाला नसल्याने कारागृहात आहेत. कैद्यांना कोर्ट कामकाजासाठी कोर्टात दाखल केले जाते. मागील कोरोना परिस्थितीत कारागृह प्रशासनाने उपाययोजना करत. किरकोळ गुन्ह्यात कारागृहात असलेल्या न्यायाधीन बंद्यांना तात्पुरते जामीन देण्यात आले. कारागृहात गर्दी होऊ नये आणि यंत्रणेवर ताण पडू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला होता.

तसेच त्या अधिकाऱ्याने म्हटले, एखादा कैदी बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला तात्पुरत्या कारागृहात हलविण्यात येते. करोनाच्या संसर्गामुळे तात्पुरती कारागृहे सुरू करण्यात आली आहे. तात्पुरत्या कारागृहात विलगीकरण कक्ष आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विलगीकरणातील कैद्यांवर उपचार करण्यात येतात. एखादा रुग्ण गंभीर असल्यास त्याला तात्काळ करोना उपचार केंद्रात नेले जाते. तर राज्यात येरवडा, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, तळोजा, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे मध्यवर्ती कारागृहे आहेत. कारागृहात कैदी दाखल करण्यापूर्वी त्यांची कोव्हीड टेस्ट केली जाते.

राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, सुनील रामानंद म्हणाले, पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत आपल्याकडील कारागृहात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी राहिले. मागील वर्षभरात राज्यातील कारागृहातून ६० ते ७० हजार कैदी बाहेर पडले. कारागृह प्रशासनाने कैद्यांबरोबर समन्वय साधला. बाहेरून कारागृहात येणाऱ्या कैद्यांना थेट प्रवेश न देता त्यांची तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक कैद्याची तपासणी करण्यात आली. एखादा कैदी बाधित आढळल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. असे त्यांनी माहिती दिली.