Pune Coronavirus News : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वाढले ‘कोरोना’चे रूग्ण; जाणून घ्या शहरात कोणत्या भागात किती रूग्ण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील कोरोनाची रुग्ण संख्या घटली असली तरी महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. पुण्यात कोरोनानं सर्वाधिक थैमान घातलं आहे. अथक प्रयत्नानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुण्याला यश आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहरातील काही भागात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली. मात्र, शहरामध्ये लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता आणि मास्क शिवाय फिरताना दिसत आहेत. पहिल्या लाटेत शहरातील पेठांमध्ये रुग्ण संख्या जास्त होती. तर शहराबाहेर कमी होती. मात्र आता परिस्थिती याउलट झाली आहे. पेठांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली तर बाहेरच्या भागात रुग्ण वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पुणेकरांनी असंच जर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर राज्य सरकारकडून नवीन लॉकडाऊन केला जाऊ शकतो. कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या पुण्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, काही लोकांकडून उल्लंघन केले जात असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन होणार की नाही हा सध्यातरी प्रश्नच आहे. पुण्यातील कोणत्या भागात जास्त रुग्णसंख्या आहे त्या भागात कंटेन्मेंट झोनची घोषणा होऊ शकते असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

कोणत्या भागात किती रुग्ण ?

शिवाजीनगर – 23

बिबवेवाडी -42

सिंहगड रोड -32

कसबा पेठ – 15

येरवडा – 24

कोथरुड – 19

हडपसर – 27

नगर रोड – 28

वारजे – 32

औंध बाणेर – 22