Corona Vaccine Booster shot | कोरोना व्हॅकसीनच्या तिसर्‍या डोसची सुद्धा आवश्यकता आहे का? जगभरात चर्चा सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगभरात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (corona delta variant) खुप वेगाने पसरत आहे. अनेक एक्सपर्ट सध्या व्हॅक्सीनचा तिसरा डोस म्हणजे बूस्टर शॉट (Corona Vaccine Booster shot) बाबत बोलत आहेत. व्हॅक्सीनच्या तिसर्‍या डोसने कोरोनाला (Corona Vaccine Booster shot) मोठ्या कालावधीपर्यंत रोखले जाऊ शकते असे काही तज्ज्ञ म्हणत आहेत तर काही एक्सपर्ट म्हणत आहेत सध्या व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची आवश्यकता नाही. त्यांच्यानुसार सध्या हे आवश्यक आहे की, लोकांना व्हॅक्सीनचा किमान एक डोस मिळावा.

या महिन्याच्या सुरुवातीला फायजरने म्हटले होते की, ते अमेरिका आणि युरोपीय अधिकार्‍यांकडून आपल्या व्हॅक्सीनचा तिसरा डोस देण्याची परवानगी मागतील. त्यांचे म्हणणे आहे की, लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी जास्त इम्युनिटी तयार होईल. कंपनीकडून हे सुद्धा म्हटले गेले आहे की व्हॅक्सीनचे दोन डोस लोकांना किमान 6 महिन्यापर्यंत कोरोना संसर्गापासून सुरक्षा देतील.

 

तिसर्‍या लाटेची तयारी?

कंपनीचे म्हणणे आहे की कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आल्याने व्हॅक्सीनचा परिणाम थोडा कमी होईल. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथोनी फाउची यांनी मंगळवारी सीएनबीसीवर म्हटले की, फायजर/बायोएनटेकच्या तिसर्‍या डोसचा अर्ज ’एक उपयुक्त तयारी (त्या स्थितीसाठी) होता, ज्यात बुस्टरची आवश्यकता असू शकते. प्रत्येकाने दोन डोस घेणे आवश्यक आहे.

मेडिकल एजन्सीजचे काय म्हणणे आहे?सध्या
असा कोणताही संकेत नाही की मेडिकल एजन्सीज त्या सर्वांसाठी तिसर्‍या डोसची शिफारस करतील ज्यांना अगोदरच दोन डोस मिळाले आहेत.
युरोपियन मेडिसिन एजन्सी आणि युरोपीयन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे म्हणणे आहे की,
सध्या हे सांगणे घाईचे ठरेल की तिसर्‍या डोसची आवश्यकता आहे किंवा नाही.
त्यांनी एका संयुक्त वक्तव्यात म्हटले,
लसीकरण अभियान आणि सुरू असलेल्या संशोधनातून आतापर्यंत हे समजण्यासाठी पुरसा डेटा उपलब्ध नाही की लसीची सुरक्षा किती काळ राहील.
डब्ल्यूएचओचे सुद्धा असेच म्हटले आहे.

Web Titel :- Corona Vaccine Booster shot | covid 19 vaccine booster shot requirement

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट