देशात 16 जानेवारीपासून ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार, जाणून घ्या सर्वप्रथम कोणाला मिळणार प्राथमिकता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना व्हायरस व्हॅक्सीन बाबत देशातील राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, 16 जानेवारीपासून कोरोना व्हॅक्सीन देण्यास सुरूवात केली जाईल. लसीकरण कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अगोदर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्य दिले जाईल, ज्यांची अंदाजे संख्या सुमारे 3 कोटी आहे.

यानंतर 50 वर्षांच्यावरील वयाच्या गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाईल, ज्यांची अंदाजे संख्या 27 कोटीच्या जवळपास आहे. माहिती कार्यालयाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या माहितनुसार, केंद्र सरकारने लोहडी, मकर संक्रांती, पोंगल आणि माघ बिहूच्या नंतर लसीकरण अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.