Corona Virus : चीनचा ‘हावरेपणा’ काही सुटत नाही, ‘कोरोना’ व्हायरसबद्दल पुन्हा करतोय मोठी चूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसाठी सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे चीनवर जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका आहे, तर दुसरीकडे चीनी अर्थव्यवस्था घरंगळायला सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत चीनच्या नेतृत्वाला वाटत आहे की अर्थव्यवस्थेचा वेग पुन्हा वाढावावा, कारण यामुळे नुकसान कमी होईल. परंतु अशाने कोरोना व्हायरस अजून फोफावण्याची शक्यता आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना व्हायरसमुळे कम्यूनिस्ट चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

चीनच्या नेतृत्वात बदल –
चीनी नेतृत्वाकडून टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि दबावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. चीनी राष्ट्रपतींच्या मते आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उत्पादन कार्य लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. चीनला आर्थिक विकास दर वाढवण्याची लालसा आहे. त्यासाठी चीनला भीती आहे की कोरोना व्हायरसमुळे ते आर्थिक स्तरावर मागे येतील की काय?

अनेक ठिकाणी सुरु झाल्या कंपन्या –
वुहानपासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या झेजियांग प्रांतात अनेक ठिकाणी उत्पादन सुरु झाले आहे. एका अहवालानुसार एका कपडे निर्मिती कंपनीचे मालक डॉन्ग लियू यांनी सांगितले की, आमची आता सर्वात मोठी समस्या कामगारांची आहे. लोक कोरोना व्हायरसमुळे घाबरले आहेत. ते घराबाहेर येऊ इच्छित नाहीत. त्यांच्या कंपनीत 400 पेक्षा जास्त कामगार आहेत. परंतु त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पहिल्याप्रमाणे उत्पादन होणार नाही. ते म्हणाले की काही दिवसात परिसरातील अनेक कंपन्या किंवा फॅक्टरी सुरु होतील.

वुहानमध्ये अजूनही कोरोनाने लोक प्रभावित आहेत परंतु आर्थिक उत्पादन कार्य सुरु झाले आणि लोकांनी कारखाण्यांत ये-जा करण्यास सुरुवात केली तर कोरोना व्हायरसला रोखणे अशक्य होऊन बसेल. ग्वांगझू येथील रेस्पिरेटरी सिस्टमचे डॉक्टर झॉन्ग नानशान म्हणाले की कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. जर उत्पादन कार्य सुरु केले तर हा धोका आणखी वाढेल. महामारी भयानक रुप दाखवू शकते.

चीनवर लावण्यात आले आरोप –
चीनमधून कोरोना व्हायरससंबंधित अनेक वृत्त येत आहेत. यातील काही कॉन्स्पिरसी थिअरी देखील आहे. एक थिअरी आहे की चीनमध्ये जैविक शस्त्र विकसित केली जात आहेत आणि कोरोना व्हायरस त्याचाच परिणाम आहे. रशियाच्या मीडियामध्ये या संंबंधित अहवाल प्रकाशित होत आहेत.

महामारीला लपवले –
चीनवर कोरोना व्हायरस लपवून ठेवल्याचा आरोप लावला आहे. अनेक अहवालात खुलासा झाला की चीनने कोरोना व्हायरसकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर एका डॉक्टरने सरकारकडे याबाबत माहिती दिली तर त्याचाच आवाज दाबण्यात आला. त्यानंतर त्या डॉक्टरचा मृत्यू कोरोनानेच झाला.

धोका का पत्करत आहे चीन –
जगभरात कोरोनामुळे सर्वात मोठी आरोग्य आणीबाणी घोषित करुन देखील चीन पुन्हा आर्थिक कार्य सुरु करुन धोका का पत्करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जगातील अनेक कंपन्यांनी सांगितले की त्यांच्या उत्पादनाचा वेग कमी झाला आहे. कारण त्यांचे चीनमधील उत्पादन बंद आहे. चीनी नेतृत्वाला वाटते की कोरोना त्यांच्या आर्थिक विकासातील बाधा ठरु नये परंतु यामुळे भीतीदायक परिस्थिती निर्माण होत आहे.