Corona Virus : भारतात ‘कोरोना’ची एन्ट्री, बचावासाठी आजपासूनच डायटमध्ये समाविष्ट करा ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसने दिल्लीत धडक दिली आणि देशभरात खळबळ उडाली. व्हायरसने बाधित रुग्णाला राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. तेलंगणात देखील असेच एक प्रकरणं पाहायला मिळाले. भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता या व्हायरसपासून दूर कसे राहायचे यासंबंधित लोक माहिती घेत आहेत.

चीनच्या वैज्ञानिकांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की हे आजार प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आणि वृद्ध लोकांना लगेच होत आहे. यापासून वाचण्यासाठी हाय अँटी व्हायरल फूडचा तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात समावेश करुन घेऊ शकतात. यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्ही व्हायरसपासून सुरक्षित रहालं.

1. नारळाचे तेल –
घरातील जेवण तयार करताना त्यात मोहरीच्या (सरसो) तेलाचा वापर टाळून त्याऐवजी नारळाच्या तेलाचा वापर करु शकतात. यात लॉरिक अ‍ॅसिड आणि कॅप्रिलिक अ‍ॅसिड असते जे तुमची प्रतिकार शक्ती सुधारेल.

2. व्हिटॅमिन सी –
अँटी ऑक्सिडेंटमधून व्हिटॅमिन – सी मुळे तुमची पचनशक्ती आणखी चांगली होईल. यासाठी डेली डायटमध्ये आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, संत्रे, पेरु आणि पपई या सारख्या पदार्थांचा समावेश आहे.

3. बेरीज –
द्राक्षे, ब्लू बेरीज, क्रॅनबेरीज, स्ट्रॉबेरीज, कोकोआ, डार्क चॉकलेट सारखे पदार्थ तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे व्हायरसपासून तुमचे शरीर सुरक्षित राहिलं.

4. स्टार सौंफ –
खाण्याच्या पदार्थात तुम्ही स्टार सौंंफचा वापर अँटी व्हायरल औषधाच्या सारखेा करु शकता. यात शिकिमिक अ‍ॅसिड असते जे इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांना देखील दिले जातात.

5. आलं –
आल्यात देखील अनेक अँटी व्हायरल तत्व असतात. खाण्यापिण्याचा पदार्थात याचा आवश्य समावेश करावा. सौंफ किंवा मधासोबत याचे सेवन करता येते. दिवसातून 3 – 4 वेळा आल्याचे सेवन केल्यानंतर तुमची इम्युनिटी सिस्टम चांगली होती.

6. तुळस –
इम्यूनिटी सिस्टमला आणखी चांगले करण्यासाठी तुळस अत्यंत चांगला उपाय आहे. गुणकारी आहे. रोज सकाळी एक चमचा तुळसीचे सेवन केल्याने तुमची इम्युनिटी सिस्टम चांगली होईल. 3 – 4 काळ्या मिर्च्या आणि एक चमचा मधाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.

7. लसूण –
लसूणमध्ये अँटी व्हायरल तत्व असतात. सूपमध्ये देखील याचा वापर करतात. एक चमचा मधासोबत लसूणचे सेवन केल्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढेल.

काय खाऊ नये –
या व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करायला हवे याच बरोबर काय करायला नको हे देखील महत्वाचे आहे. डॉक्टर्सचे म्हणणे आहे की काही पदार्थांचे सेवन करु नये.

– कच्चे मांस खाणे टाळावे. मांस स्वच्छ धुवून चांगले शिजवून त्यानंतरच ते खावे.

– कच्चे अंडे खाणे देखील घातक आहे. कारण व्यायाम करणारे अनेक लोक कच्चे अंडे खातात.

– याशिवाय बाजारातून आणलेल्या भाज्या कच्च्या खाऊ नये. भाज्या नीट धुवून, कापून, शिजवून मगच खाव्यात.