Corona : छातीत वेदना आणि श्वासाच्या त्रासाची समस्या कोरोना वाढवतेय का? ‘या’ 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट्स दररोज जास्त धोकादायक होत चालले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत इन्फेक्शनचे असे भयंकर रूप पहायला मिळाले आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजवरच रूग्ण गंभीर आजारी होत आहे. गंभीर लक्षणे दिसल्यानंतर काही दिवसांच्या आत रूग्णाचा मृत्यू होत आहे. छातीत वेदना सुद्धा असेच एक सामान्य लक्षण आहे, ज्यामध्ये खुप सावध राहण्याची आवश्यकता आहे.

1 छातीत वेदना का होते –
छातीत वेदना, अस्वस्था हे शरीरातील लक्षणांचाच परिणाम असू शकते. अनेकदा श्वासाचा त्रास होऊ शकतो. कोरोना व्हायरसमुळे छातीत वेदना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे होते. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा.

2 सुका खोकला –
सुका खोकला हे सामान्य लक्षण आहे. सूका आणि वारंवार खोकला येऊन छातीतील वेदना वाढतात. अशावेळी श्वास घेण्यास त्रास होतो. हे बरगड्या आणि छातीच्या पोकळीजवळ मासपेशींना दुखापत झाल्याने सुद्धा होऊ शकते.

3 कोविड निमोनिया –
कोविड निमोनिया सुद्धा एक गंभीर लक्षण आहे. ही समस्या लंग्जच्या एयर बॅगमध्ये इन्फ्लेमेशन वाढल्याने होते. यामुळे छातीत फ्लूड वाढू लागते आणि लक्षणे जास्त गंभीर होतात. हा त्रास रात्री जास्त होतो.

4 इन्फ्लेमेशन –
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फुफ्फुसाची समस्या जास्त दिसून येत आहे. डॉक्टर्स म्हणतात, ही समस्या छातीत वेदना आणि अस्वस्थेचे एकमेव कारण असू शकते. चेस्ट एक्स-रे किंवा सीटी स्कॅनने केल्यानंतर यावर सल्ला दिला जातो.

5 हृदयसंबंधी रोग –
कार्डिएक डिसीज कोरोनरी आर्टरी डिसीजची समस्या असलेल्या लोकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. शरीरात वेगाने पसरणारे हे इन्फेक्शन एखाद्या प्री-एग्झिस्टिंग डिसीजला सुद्धा ट्रिगर करू शकते. हे मायोकार्डायटिस, माएल्जियासह अनेक प्रकारच्या हृदय समस्यांचे कारण बनू शकते.

6 रक्तात इन्फेक्शन –
सार्स-कोव्ह-2 आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत आहे. कोविड-19 शरीरात रक्त प्रवाहाच्या माध्यमातून पसरतो. हा पल्मोनरी एम्बोलिज्मचे कारण ठरू शकतो, ज्यामध्ये एक ब्लड क्लॉट तुटून फुफ्फुसात पसरतो. यामुळे रूग्णाच्या छातीत वेदना होतात, शिवाय फुफ्फुसात रक्ताचा पुरवठा सुद्धा बाधित होतो.