Coronavirus : ‘नोएडा-लखनऊ-गाझियाबाद-वाराणसी’सह UP मधील 15 जिल्हयातील ‘हॉटस्पॉट’ परिसर ‘सील’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर योगीच्या युपी सरकारने १५ जिल्ह्यात पूर्णपणे सील केले असून हा आदेश आज रात्री १२ वाजेपासून लागू होणार आहे. या जिल्ह्यात १३ एप्रिल पर्यंत कोणतीही ये-जा होणार नाही. इतके नाही तर सामानाची होम डिलिव्हरी होईल.

युपी सरकारने लखनऊ, आग्रा, गाझियाबाद, गौतमबुद्ध नगर, कानपुर, वाराणसी, शामली, मेरठ, बरेली, बुलंदशहर, फिरोजाबाद, महाराजगंज, सीतापूर आणि सहारनपुर या जिल्ह्यात १३ एप्रिल पर्यंत पूर्णपणे सील केले आहे.

योगी सरकारचे म्हणणे आहे कि १३ एप्रिल पर्यंत पूर्णपणे सील केले आहे. यादरम्यान कोणतीही दुकाने खुली राहणार नाहीत, केवळ आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी होईल. यासह केवळ कर्फ्यू मध्ये असलेल्या घरांना बाहेर येण्याची परवानगी असेल. १३ एप्रिलच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, त्यानंतर पुढचा निर्णय होईल.