×
Homeआरोग्यCoronavirus second wave in India : कोरोनाचे बहुतांश रूग्ण करत आहेत 'या'...

Coronavirus second wave in India : कोरोनाचे बहुतांश रूग्ण करत आहेत ‘या’ 6 चूका, जीवासाठी ठरू शकते ‘घातक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण केले आहे. अशी स्थिती असताना काही लोक मनानेच कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून वाचण्यासाठी स्वत:च काही उपाय करत आहेत, औषधे घेत आहेत यामुळे योग्य उपचार घेण्यास उशीर झाल्याने हा आजार जीवघेणा ठरत आहे. यासाठी लक्षणे आढळल्यास प्रथम डॉक्टरांकडे जा, त्यांच्या सल्ल्याने टेस्ट करा, आयसोलेट व्हा, औषधे घ्या.

या चूका करू नका

1 पेनकिलर्स –

पेनकिलर्स कोरोनातून रिकव्हरीचा कालावधी कमी करत नाही, तसेच कोरोना संसर्गापासून वाचवत नाही. म्हणून लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जा.

2 कफ सिरप –

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घशात खवखव, खोकल्यावरील औषध घ्या.

3 अँटीबायोटिक्स –

अँटीबायोटिक कोरोनाविरूद्ध उपयोगी नाही. हात धुण्यासाठी सुद्धा अँटीबॅक्टेरियल हँड वॉश उपयोगी नाही, त्याएवेजी 60 टक्के अल्कोहोल युक्त सॅनिटायजर्स वापरा.

4 आयुर्वेदिक उपचार –

कोरोना आयुर्वेदिक उपचाराने बरा होतो, याबाबत अजूनपर्यंत कोणताही पुरावा नाही. म्हणून अगोदर डॉक्टरांकडे जा.

5 व्हिटॅमिन-डी चा मेगाडोस –

व्हिटॅमिन-डीचा मेगाडोस आपल्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशी औषधे घ्या.

6 पाण्याची वाफ –

वाण्याची वाफ घेतल्याने कोरोना व्हायरसचा परिणाम कमी होतो, असे म्हटले जाते. मात्र, यासंदर्भात सुद्धा कोणताही पुरावा नाही. याएवेजी भरपूर प्रमाणात पाणी प्या. हेल्दी आहार घ्या. जास्त गोड खाणे टाळा.

Must Read
Related News