Coronavirus : कोरोनाचं संकट अचानकपणे टळणार ? 12 वर्षापुर्वीची भविष्यवाणी खरी ठरणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील वुहान प्रांतात सुरु झालेल्या कोरोना व्हायरसमुळे ३००० हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरस आता चीनपुरता मर्यादित राहिला नसून, संपूर्ण जगात पसरला आहे. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसची २९ लोकांना लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरस बद्दलची भविष्यवाणी अनेक वर्षांपूर्वीच झाली होती. अमेरिकन लेखक डीन कुटज यांच्या पुस्तकाच्या आधारे ४० वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसच्या धोक्याबद्दल दावा केला होता. या पुस्तकात लिहीलेल्या बाबी कोरोना व्हायरस संबंधित लिहिलेल्या असून, सोशल मीडियावर त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकन लेखिका सिल्व्हिया ब्राऊनी यांनी २००८ मध्ये  ‘एन्ड ऑफ डेज’ नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाबद्दलची लक्षणे पुस्तकांमधल्या गोष्टींशी समरूप आहेत.

२०२० मध्ये निमोनियासारखा गंभीर आजार पसरेल आणि ह्या आजाराचा फुफ्फुसे आणि श्वसननलिकेवर परिणाम होणार असून, यावर कोणताही उपचार उपलब्ध असणार नाही, असा उल्लेख ‘एन्ड ऑफ डेज’ या पुस्तकात दिसून येतो. हा आजार जेवढ्या वेगाने पसरेल, तेवढ्याच वेगाने तो संपेल सुद्धा. १० वर्षांनंतर हा आजार परत येईल आणि आपोआप संपून जाईल, असे या पुस्तकात लिहिले आहे.

कोण आहेत सिल्व्हिया ब्राऊनी
सिल्व्हिया ब्राऊनी स्वतः ला अध्यात्मिक गुरु आणि मानसशास्त्रज्ञ मानत होत्या. आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांचे टीव्ही आणि रेडिओ वरती कार्यक्रम होत असत. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या पुस्तकाची जोरात विक्री होत असून, सिल्व्हिया यांच्या वेबसाइटच्या माहितीनुसार ही पुस्तके सध्या संपली असून, सिल्व्हिया ब्राऊनी यांचे २० नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.