Coronavirus : कोविड-19 विरूध्दची वॅक्सीन पहिल्यांदा कोणाला दिली पाहिजे ? समोर आला तज्ञांचा ‘मास्टर प्लॅन’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर जगभरात शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करत आहेत. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत या जीवघेण्या महामारीवर वॅक्सीन येऊ शकते. मात्र, सुरूवातीला वॅक्सीनची मोठ्या प्रमाणात निर्मिती अशक्य आहे. यासाठी हेल्थ एक्सपर्टना अगोदरच ठरवावे लागेल की, वॅक्सीन सर्वप्रथम कुणाला दिली जावी. म्हणजे याच्यावर प्रथम अधिकार कुणाचा असेल.

वॅक्सीन डिस्ट्रीब्यूशनवर हेल्थ एक्सपर्टचा प्लॅन
जागतिक स्तरावर 19 हेल्थ एक्सपर्टच्या एका टीमने वॅक्सीन डिस्ट्रिब्युशनसाठी तीन टप्प्यांच्या योजनेचा प्रस्ताव ठेवला आहे. वॅक्सीन डिस्ट्रिब्युशनच्या या मॉडेलला एक्सपर्ट्सने ’फेयर प्रायॉरिटी मॉडल’ नाव दिले आहे. या टीमचा उद्देश भविष्यात कोविड-19 चा प्रतिकूल प्रभाव करण्याचा आहे.

सर्वप्रथम कुणाला मिळावी वॅक्सीन?
या टीमचा सल्ला आहे की, वॅक्सीन वितरणापूर्वी पहिल्या टप्प्यात अकाली मृत्यु (प्रीमॅच्युअर डेथ) आणि गंभीर पीडित रूग्णांनाच वॅक्सीनेट केले जावे. सामान्यपणे जागतिक आरोग्य निर्देशांक याच प्रकारे ठरवला जातो.

दुसर्‍या टप्प्यात कुणाला मिळणार वॅक्सीन ?
दुसर्‍या टप्प्यात आर्थिक स्थितीच्या आधारावर वॅक्सीन वितरण करण्याबाबत म्हटले आहे. या स्टेजमध्ये गरीबांना वॅक्सीन देण्यावर भर असेल, जेणेकरून गरीब कुटुंबाना महामारीचा धोका निर्माण होणार नाही. मात्र, या टप्प्यात सुद्धा प्रीमॅच्युअर डेथ आणि गंभीरदृष्ट्या पीडित रूग्णांकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल.

तिसर्‍या टप्प्यात कम्युनिटी ट्रान्समिशन रोखण्याचा प्रयत्न
वॅक्सीन वितरणाच्या तिसर्‍या टप्प्यात व्हायरस कम्युनिटी ट्रान्समिशन लक्षात घेऊन काम करावे लागेल. यामुळे व्हायरस एका देशातून दुसर्‍या देशात पसरण्यापासून रोखता येईल. मात्र, व्हायरस ट्रान्समिशन रोखण्यासाठी सर्व देशांना योग्य प्रमाणात वॅक्सीनची गजर असेल. प्रत्येक टप्प्यात प्रत्येक देशाला एका ठराविक संख्येत वॅक्सीनचे वाटप करण्यात येईल. यामध्ये हेदेखील पाहावे लागेल की, व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव कोणत्या ठिकाणी आहे.

डब्ल्यूएचओची काय आहे योजना ?
याविरूद्ध डब्ल्यूएचओची योजना आहे की, प्रत्येक देशाच्या तीन टक्के लोकसंख्येला वॅक्सीनेट करून याची सुरूवात करण्यात यावी. यानंतर लोकसंख्येनुसार लोकांना वॅक्सीन मिळावी. ही प्रक्रिया तोपर्यंत जारी ठेवावी, जोपर्यंत प्रत्येक देशातील 20 टक्के नागरिक वॅक्सीनेट होत नाहीत.

वॅक्सीन डिस्ट्रिब्युशनवर एक्सपर्टचा सल्ला
अमेरिकेत पेनिसिल्वेनिया युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक ईजेकीन जे. एमानुएल यांचे म्हणणे आहे की, कोरोना वॅक्सीनचे वितरण लोकांमध्ये निष्पक्ष पद्धतीने पोहचले पाहिजे. सामान्यत: आपण रूग्णाची स्थिती पाहूनच ठरवतो की, वॅक्सीन अगोदर कुणाला द्यावी. वॅक्सीनद्वारे महामारीचा सामना करत असलेल्या लोकांचा डेथ रेट निश्चितपणे कमी होईल.

भारतात कोरोनाचा प्रभाव
कोरोना व्हायरसची संपूर्ण जगात आतापर्यंत 2 कोटी 70 लाखांपेक्षा सुद्धा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 8 लाख 83 हजारपेक्षा सुद्धा जास्त मृत्यू झाला आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका पडत असलेल्या देशांमध्ये भारत भारत तिसर्‍या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात 41 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित आहेत.