Corona : CT स्कॅनच्या नजरेतून नाही वाचणार कोरोना, केव्हा करावी ही टेस्ट आणि कशी रिड करावी? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभरात विध्वंस चालवला आहे. कोरोना प्रकरणे वाढत असताना नवीन म्यूटेट व्हायरस आरटी-पीसीआर टेस्टमध्ये सुद्धा सापडत नसल्याने चिंता वाढली आहे. अशावेळी पुन्हा टेस्ट करण्याऐवजी रूग्णाला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

काय आहे एचआरसीटी रिपोर्ट –

हाय रिजोल्यूशन कॉम्प्यूटेड टोमोग्राफी (एचआरसीटी) टेस्ट शरीरात वायरल इन्फेक्शनच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची एक वेगळी पद्धत आहे. सध्या छातीचे स्कॅन ते लोक करत आहेत, ज्यांच्या शरीरात इन्फेक्शनची कॉमन लक्षणे तर दिसत आहेत, पण आरटी-पीसीआर टेस्टमध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. एचआरसीटी टेस्ट एक डायग्नोस्टिक टूल आहे जे फुफ्फुसांची सध्याची स्थिती काय आहे हे सांगते. सीटी स्कॅन वायरल इन्फेक्शनचे गांभीर्य आणि त्याच्या प्रसाराची अचूक माहिती देण्याचे काम करत आहे. यामुळे रूग्णांना योग्य उपचार घेण्यास मदत होत आहे.

असा रिड करा एचआरसीटी रिपोर्ट –

सामान्यपणे एचआरसीटी टेस्टची रिडिंग CORAD स्कोर आणि सीटी स्कोरच्या मापाच्या आधारवर केली जाते, जो आरटी-पीसीआरमध्ये डिटेक्ट केलेली सीटी व्हॅल्यूपेक्षा एकदम वेगळी असते. सीटी स्कॅनमध्ये CORAD च्या आधारावर शरीरात वायरल इन्फेक्शनचा स्तर ठरवला जातो.

CORAD चे स्कोरिंग 1-6 अंकांच्या दरम्यान केले जाते, ज्यामध्ये 1 चा अर्थ आहे – संशयित व्यक्ती कोविड निगेटिव्ह आहे म्हणजे त्याच्या फुफ्फुसांचे फंक्शन नॉर्मल आहे. 2-4 च्या दरम्यान स्कोअर वायरल इन्फेक्शनची शक्यता दर्शवतो. स्कोअरमध्ये 5 चा अर्थ कोविड-19 च्या हलक्या लक्षणांशी आहे. जर रिपोर्टमध्ये स्कोअर 6 येत असेल तर समजा की कोविड-19 ने रूग्णाला धोका खुप जास्त आहे. आरटी-पीसीआरचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि श्वासात त्रासाच्या आधारावरसुद्धा रूग्णाला CORAD-6 स्कोअर दिला जातो.

CORADS च्या शिवाय, एचआरसीटी स्कॅनमध्ये कधी-कधी सीटी सीव्हियरिटी स्कोअरसुद्धा नमूद केला जातो, जो आपल्याला फुफ्फुसांच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत सांगतो. प्रत्येक लॅबमध्ये यास वेगवेगळ्या पद्धतीने रिड केले जाते. बहुतांश लॅबमध्ये यास 1-40 किंवा 1-25 च्या दरम्यान रेखांकित केले जाते. स्केलवर जास्त स्कोअर फुफ्फुसांवर मोठा धोका आणि कोविड-19 चे गांभिर्य दर्शवतो. मात्र, हेल्थ एक्सपर्ट म्हणतात की या टेस्टची सर्वांनाच आवश्यकता नाही, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही टेस्ट केली जाते.