Coronavirus : संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांत दाखवतो कोरोना व्हायरस त्याचे खरे रुप; जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच या कोरोना व्हायरसबाबत दिवसेंदिवस विविध माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व्हायरस किती दिवसांत हल्ला करतो, याची माहिती घेणार आहोत.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांच्या रिकव्हरी पिरीअडमध्ये 5 ते 10 दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे कालावधीत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सौम्य लक्षणे असणारे रुग्ण कोरोना व्हायरसला अगदी सोप्या पद्धतीने नियंत्रित करू शकतात. पण 5 व्या दिवशी दिसणाऱ्या लक्षणांवर विशेष लक्षण देऊन समजण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच इन्फेक्शनच्या सुरुवातीच्या दिवसांत लक्षणे भ्रम निर्माण करतात. यादरम्यान रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसू लागतात. तर काही रुग्णांमध्ये लक्षणेच नसतात.

याशिवाय 5-10 दिवसांच्या आयसोलेशन कालावधीत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीवर कोरोना व्हायरस वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करत असतो. या कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या रुग्णाच्या शरीरात अँडिबॉडिज् बनवतो. कोरोना व्हायरससोबतची लढाई 6 व्या किंवा 7 व्या दिवशी सुरु होते. तेव्हा प्रकृती गंभीरपणे नाजूक होते.

ही गंभीर लक्षणेही असू शकतात…

ऑक्सिजन सॅच्युरेशनाचा स्तर खाली येणे, चक्कर येणे किंवा ताप येणे यांसारखे आजार उद्भवू शकतात. अस्वस्थ वाटणे, अंगजड आणि श्वास घेण्यास अडचणी येतात. इन्फेक्शनच्या या दुसऱ्या टप्प्यात अनेकावेळा रुग्णांना हायपोस्कियाची लागण होऊ शकते. त्यामध्ये बिगर कोणत्याही लक्षणांनी रुग्णांची ऑक्सिजन पातळी खाली जात असते.