Coronavirus : तुमच्या घरी देखील कोरोनाचा रूग्ण असेल तर घाबरू नका, स्वतःच्या बचावासाठी ‘या’ पध्दतीनं घ्या काळजी, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची हलकी किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांना डॉक्टर घरी राहूनच उपचार करण्याचा सल्ला देत आहेत. होम आयसोलेशनमध्ये रूग्णाची देखभाल करणार्‍यांची जबाबदारी वाढते. त्यांना रूग्णाची काळजी घेता-घेता स्वताचा बचाव सुद्धा करावा लागत आहे. सीडीसीने घरी रूग्णांची देखभाल करत असलेल्या लोकांसाठी आणि घरातील इतर सदस्यांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या आहेत.

रूग्णाची काळजी घेणार्‍या व्यक्तीला डॉक्टरांनी दिलेली औषधे माहित असावीत. डॉक्टरांशी संपर्कात रहावे. त्यांच्या निर्देशांचे पालन करा. बहुतांश रुग्णांना आठवडाभरात बरे वाटते.

ADV

रूग्णाच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. सामान ऑनलाइन मागवा. पाळीव प्राण्यांच्या थेट संपर्कात येऊ नका.

गंभीर लक्षणांवर लक्ष ठेवा – श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, जास्त थकवा अशा स्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

असा करावा स्वताचा बचाव –
* रूग्णासोबत कोणताही शारीरीक संपर्क ठेवू नका. 6 फुटांचे अंतर ठेवा.
* अगोदर कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीने रूग्णाची काळजी घ्यावी.
* रूग्णासाठी वेगळी खोली, बाथरूम असावे. वस्तू शेयर करू नये.
* खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा, व्हेंटीलेशन असावे.
* घरात कुणाला येऊ देऊ नका. रूग्णाची काळजी घेत असाल त स्वता सुद्धा विनाकारण बाहेर जाऊ नका.
* रूग्णाला त्याच्या खोलीतच जेवण द्या. रूग्णाची देखभाल करणार्‍या व्यक्तीने ग्लव्हज घालूनच भांडी उचलावीत आणि साबण, गरम पाण्याने धुवून घ्यावीत.
* संक्रमित व्यक्तीने घरात मास्क वापरावा. तो वेळोवेळी बदलत रहावे.
* देखभाल करणार्‍याने वारंवार साबण आणि पाण्याने हात धुवावेत. डोळे, नाक आणि तोंडाला हात लावू नये.
* रूग्णाची खोली दररोज साबण आणि डिटर्जंटने स्वच्छ करा. यावेळी मास्क आणि ग्लव्हज घाला.
* रूग्णाकडे लक्ष देत असताना आपल्या लक्षणांकडे सुद्धा लक्ष द्या. नवा स्ट्रेन खुपच संसर्गजन्य आहे. काही लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.