Coronavirus : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 32 लाखाच्या पुढं, या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण अन् मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा मंगळवारी 32 लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत 32 लाख 34 हजार 475 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील 24 तासात 67 हजार 151 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एका दिवसात 1059 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशात 10 राज्य अशी आहेत, जेथे 1000 पेक्षात जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये सर्वात वर महाराष्ट्र आहे, जेथे 22.7 हजार रूग्णांनी जीव गमावला आहे.

याशिवाय तमिळनाडु, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि पंजाबचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसरा सर्वात प्रभावित देश आहे, परंतु प्रत्येक दिवशी कोरोनाच्या नव्या केस येथे सर्वात जास्त येत आहेत. मागील दिवसात अमेरिकेत कोरोनाच्या 40,098 नव्या केस आल्या आणि ब्राझीलमध्ये 46,959 नवे रूग्ण सापडले.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 07 हजार 267 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 24 लाख 67 हजार 759 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत 59 हजार 449 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान केंद्र सरकारने टेस्टींग वाढवली आहे. आता प्रत्येक 10 लाखांच्या लोकसंख्येत 26,648 लोकांची तपासणी होत आहे. यामध्ये 8.72% म्हणजे 2,324 लोक संक्रमित आढळत आहेत.

देशात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात दिड लाखापेक्षा जास्त संक्रमित उपचार घेत आहेत. यानंतर दुसर्‍या नंबरवर तामिळनाडू, तिसर्‍या नंबरवर दिल्ली, चौथ्या नंबरवर गुजरात आणि पाचव्या नंबरवर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारताचे तिसरे स्थान आहे.

या राज्यात सर्वात जास्त मृत्यू
महाराष्ट्रात 24 तासात 329 रूग्णांचा मृत्यू झाला. येथे मरणार्‍यांची संख्या आता 22,794 झाली आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये 148 आणि तमिळनाडुत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात 92, पश्चिम बंगाल 58, पंजाब 49, गुजरात 20, मध्य प्रदेश 19, दिल्ली आणि बिहार 17-17, जम्मू काश्मीर 14, राजस्थान 13, छत्तीसगढ आणि झारखंड 12-12, हरियाणा आणि केरळ 10-10, तेलंगना, गोवा आणि ओडिसात 9-9, आसाम आणि पुदुचेरीत 8-8, उत्तराखंड आणि त्रिपुरात 6-6, चंडीगगढमध्ये 3, मणिपुर आणि अंदमान निकोबारमध्ये 2-2, हिमाचल प्रदेशात 1 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी कोविड-19ची 10,425 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण रूग्णांची संख्या 7,03,823 झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे सात लाखांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी 17 ऑगस्टला कोविड-19 रूग्णांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली होती. 24 तासात 12,300 रूग्ण बरे झाले आहेत. यासोबतच राज्यात राज्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून मुक्त होणार्‍यांची संख्या 5,14,790 झाली आहे.