Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 83341 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 39 लाखाच्या पुढं

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या 39 लाख 36 हजार 748 झाली आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोनाचे 80 हजारपेक्षा जास्त नवे रूग्ण सापडले आहेत. 24 तासात कोरोनाच्या विक्रमी 83,341 पॉझिटिव्ह केस वाढल्या. गुरुवारी 67,491 लोक बरे झाले आहेत आणि 1,096 रूग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 8 लाख 31 हजार 124 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 30 लाख 37 हजार 152 लोक बरे झाले आहेत. या व्हायरसमुळे 68 हजार 472 रूग्णांचा बळी गेला आहे.

यामध्ये 70% मृत्यू आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडु आणि महाराष्ट्रातच झाले आहेत. प्रति 10 लाखांच्या लोकसंख्येवर मृत्यूंच्या प्रमाणात भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत खुप चांगली आहे. याबाबतीत भारत 83व्या स्थानावर आहे. येथे 10 लाख लोकसंख्येवर 49 मृत्यू होत आहेत. पेरू मध्ये हा आकडा 885 आणि अमेरिकेत 573 आहे. तर, भारत तीसरा देश आहे, जेथे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत.

कोरोनाचा रेकॉर्ड
एका दिवसात विक्रमी सर्वात जास्त 11.70 लाख सॅम्पलची चाचणी करण्यात आली. तर एका दिवसात विक्रमी 68,584 रूग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 च्या रूग्णांचा बरे होण्याचा दर वाढून 77.09 टक्के झाला आहे आणि मृत्यूदर घसरून 1.75 टक्के झाला आहे. देशात सध्या 8,15,538 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाने प्रभावित प्रमुख राज्यांची स्थिती
महाराष्ट्रात 24 तासात कोरोनाच्या विक्रमी 18 हजार 105 नव्या केस समोर आल्या आहेत. यासोबतच राज्यामध्ये कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 2 लाख 5 हजार 428 झाली आहे. आतापर्यंत 8 लाख 43 हजार 844 लोक सक्रमित आढळले आहे. गुरुवारी 391 लोकांचा मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून जगात सर्वात जास्त प्रकरणे भारतात वाढत आहेत. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सर्वात जास्त प्रकरणे सापडत आहेत.